ग्रामपंचायत खेडे (हिंगलाजनगर)

गावाविषयी माहिती

खेडे (हिंगलाजनगर) हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ३०५५ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १, अंगणवाडी केंद्रे ३ ,आश्रम शाळा अशी शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणी साठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून ऊस, द्राक्ष, कांदा, सोयाबीन, डाळिंब व मका ही प्रमुख पिके घेतली जातात. द्राक्षे या पिकाच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.

खेडे (हिंगलाजनगर) ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत भरपूर घरांना लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत खेडे (हिंगलाजनगर) गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ९ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

खेडे (हिंगलाजनगर) गाव आज निफाड तालुक्यातील एक आदर्श विकसनशील व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते

black blue and yellow textile

भौगोलिक स्थान

खेडे (हिंगलाजनगर) हे गाव जिल्ह्याच्या ठिकाणापासून ४८ कि.मी तर निफाड तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे ७ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण क्षेत्रफळ ८.६९.७६ हेक्टर असून ग्रामपंचायतीमध्ये ०४ वार्ड आहेत. एकूण ५४० कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या ३०५५ आहे. त्यामध्ये पुरुष १६९५ व १३६० महिला यांचा समावेश होतो.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेती योग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे. येथे हवामान उष्ण कटिबंधीय आहे. उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३८से. ते ४० से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात ५से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६०ते७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.

खेडे(हिंगलाजनगर) गाव द्राक्ष,सोयाबीन ,मका,डाळिंब व ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध असून परिसरात पाणलोट क्षेत्राचा विकास झाल्यामुळे जलसंधारणाची चांगली सोय आहे.

black blue and yellow textile

लोकजीवन

खेडे (हिंगलाजनगर) गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून द्राक्ष, ऊस, कांदा, मका व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेती सह काही लोकदुग्धव्यवसाय व लघुउद्योग यामध्येही कार्यरत आहेत.गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्‌या जातात.

वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा सप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूर्जाना विशेष महत्त्व आहे.येथील लोकमेहनती, मदतशील व अतिथी देवो भव या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्यगटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

खेडे (हिंगलाजनगर) लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृती सोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात

black blue and yellow textile

संस्कृती व परंपरा

खेडे (हिंगलाजनगर) गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गावातील प्रमुख देवतांच्या पूजा अर्चा व साप्ताह यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावनादृढ होते.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी सारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुले, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात

गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळयांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपताना नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो स्वयंसहाय्यगटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.देवपूर गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

black blue and yellow textile

प्रेक्षणीय स्थळे

T हिंगलाज माता देवी मंदिर T

हिंगलाज माता देवी मंदिर मौजे खेडे (हिंगलाजनगर) ता. निफाड जि. नाशिक येथील पुरातन मंदिर असून नागरिकांचे परिसरातील लोकांचे ग्रामदैवत म्हणून प्रसिध्द आहे.या परिसरातील लोक दर दिवशी सकाळी व सायंकाळी ग्रामदैवताचे पूजन व आरती करतात. तसेच बावन्न शक्तीपीठांपैकी असलेले श्री. हिंगलाज माता शक्ती पीठ हे खेडे येथे असून मुळस्थान पाकिस्तानातील हिंगलाज पर्वतावर आहे.एकूण समाजाची कुलदैवत असलेले श्री.हिंगलाज मातेचे महाराष्ट्रातील पुरातन असे एकच मंदिर खेडे येथे आहे. भाविकांना दर्शनास पाकिस्तानात जाणे नेहमी शक्य नसल्याने खेडे येथील मंदिरात भाविकांची गर्दी वाढत आहे. भारत पाकिस्तान फाळणी होऊन भाविकांची दर्शनाची गैरसोय होऊ नये म्हणूनच देवी प्रत्यक्ष मूर्ती स्वरुपात येथे स्थित झाली आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. हे मंदिर इ.स.१२२८ मधील आहे. डोंगरपुरी महाराजांनी हिंगलाज देवी मातेला खेडे येथे आणले आहे त्यांची येथे संजीवन समाधी आहे. दोन्ही हि मंदिरे पुरातन हेमाडपंथी रचनेचे असून स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना आहे. वर्षभरातील देवीचे तीन उत्सव साजरे होतात.

श्रावण शुध्द चतुर्दशी

二) पौष पौर्णिमा शाकंभरी उत्सव (प्रकटोत्सव हिंगलाज पर्वत)

三) आश्विन नवरात्र

四) हरिहर बाबा पुण्यतिथी

आश्विन नवरात्रात घट स्थापनेपासून दसऱ्यापर्यंत सुमारे ५०० महिला व पुरुष भाविक घटी बसतात. घट स्थापनेनंतर येणाऱ्या पहिल्या बुधवारी ह्या देवीच्या पादुका आणि फोटोची रथातून गावभर मिरवणूक काढली जाते. यावेळी या यात्रोत्सवात सुमारे तीन चार लाख भाविक दर्शन घेतात. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी मोठ्या प्रमाणात भंडारा केला जातो. दूरवरून येणाऱ्या भाविक तसेच गोसावी समाज यांना महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.

हिंगलाज माता नवसाला पावणारी व पंचक्रोशीतील लोकांचे श्रद्धास्थान आहे. दरमहा नवस फेडणे. जाउळाचे कामी तसेच इतर धार्मिक विधी श्रद्धापूर्वक दर्शनासाठी सुमारे सत्तर ते पंचाहत्तर हजार भाविक दर्शनासाठी येतात.